शनिवार, ९ एप्रिल, २०२२

हे आपणास माहित आहे का❓

 हे आपणास माहित आहे का❓

     उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यावर थुंकतो ?

ताजमहाल

ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता ?


कोल्हा आणि खोकड


कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत ?


डास

 डासांना दात नसतात ते आपल्या सोंडेनी चावा घेतात?


ग्रहण

    खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते ?


हत्ती

आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात ?

शार्क

 शार्क माशांना माणसाला माहीत असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही ?


सूर्य

सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे ?


पत्ते


    पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत ?


जिराफ


    जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात ?


जग


    जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात ?


दिवा


     थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे ?


शिंक


     माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही ?


गणित


     


झुरळ


    झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात ?


फुलपाखरु


     फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात ?


ध्रुवीय अस्वल


     सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात ?

मगर


     मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही ?


कोळी


     सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही ?


जीभ


     शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ ?


हत्ती

हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही ?


हृदय

 हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते ?


भोलू-भारतीय रेल्वेचा शुभंकर


  भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे ?

    

महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत ?


युरो-चलन


    युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते ?


भारताचा ध्वज


     भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही ?


बृहन्मुंबई महानगरपालिका


    १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे ?

    

 जगभरातील सुमारे १०० कोटी लोक इंग्रजी भाषेत साक्षर आहेत...?


सूर्यावरचे डाग


     इ.स.१६११ रोजी इटलीचा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो याने सूर्यावरच्या काळ्या डागांचा शोध लावला...?



    ...की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्युबा व उत्तर कोरिया या चार देशातच साम्यवादी (चिह्न चित्रित) व्यवस्था आहे...?

    ...की महान शास्त्रज्ञ आइनस्टाईन याना आपल्या बुटाची लेस बांधता येत नव्हती?

    ...की आपल्या शरिरातले सर्वात मोठे हाड आपल्या मांडीत असून सर्वात लहान हाड आपल्या कान कानात असते.


लेबल:

जे होतं ते चांगल्यासाठीच..!

 जे होतं ते चांगल्यासाठीच..!



एकदा अकबर आणि बिरबल
शिकरीला जात असतात, तलवार
काढताना अकबर चा अंगठा कापला जातो... अकबरला खूप त्रास होतो,
तो ओरडायला लागतो...
तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून म्हणून...
शहरात पाठवतो... तेवढ्यात बिरबल त्याच्या जवळ
जातो आणि म्हणतो, ''महाराज...शांत
व्हा...जे होतं ते चांगल्यासाठीच होतं...'' अकबर ला राग येतो...तो जास्तच
चिडतो...आणि शिकयांना सांगतो
'' जा बिरबल ला घेऊन जा...रात्रभर उलटं
टांगून ठेवा....आणि सकाळी-
सकाळी फाशी द्या '' सर्व शिपाई तिथून निघून
जातात....अकबर एकटाच जंगलात
असतो....तो एकटाच पुढे शिकार
करायला जातो...!! पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात, आणि त्याला डांबून ठेवतात..


अकबर ची बळी ते देणार असतात...त्यासाठ
ीची विधी करण्यात आदिवासी मग्न
होतात...तितक्यात
एका आदिवासी ची नजर अकबर च्या तुटलेल्या अंगठ्याकडे जातो व
तो ओरडून सर्वांना सांगतो ,'' हा अशुद्ध
आहे...आपण याची बळी नाही देऊशकत...
याचा अंगठा तुटलेला आहे...'' आदिवासी अकबर ला सोडून
देतात...आणि त्याला बिरबल चं बोलणं
आठवतं,


जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..' तो धावत पळत त्याच्या महलात येतो,
बिरबल ला फाशी होणारच असते
तितक्यात तो तिथे जाऊन बिरबल
ला घट्ट मिठी मरतो आणि सर्व हकीकत
सांगतो....आणि म्हणतो, '' मला माफ
कर....तुझ्यामुळे मी वाचलो...आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली....'' बिरबल हसतो आणि म्हणतो,
''नाही महाराज....जे होते ते चांगल्यासाठीच
होता...'' अकबर स्तब्ध होतो आणी विचारतो असं
कसं...तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला...चांगलं
कसं झालं??? त्यावर बिरबल म्हणतो, '' महाराज...मी जर
तुमच्यासोबत शिकरीला आलो आसतो तर
त्यांनी माझा बळी दिला असता.....म्हणून
म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.... '' तात्पर्य : मित्रांनो, आयुष्यात असे क्षण
येतील जेंव्हा तुम्ही खचून जाणार, पण
लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्यासाठीच
होतं....कदाचित पुढे त्याचा ऊपयोग
तुमच्या चांगल्यासाठी होईल...!!!

लेबल:

भवानी तलवारी च रहस्य: रत्नागिरीची देवराई आणि महाराजांचे हेर

 रत्नागिरीची देवराई आणि महाराजांचे हेर



महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी एक कथा आहे. अर्थातच देवी वगैरे प्रकट कधी होत नसते अशी आजच्या काळांत लोकांची समजूत असल्याने, ही कथा एक अलकांरिक दृष्टीकोनातून सांगितली जाते असेच इतिहासकार मानतात. प्रत्यक्षांत महाराजांचा सारा सापेक्ष हा "श्रीं ची इच्छा" म्हणूनच होता हे मात्र निर्विवाद सत्य आहे. इतिहासाच्या प्रवाहांत सत्याचे दगड गुळमुळीत होतात. त्याचप्रमाणे भवानी मातेच्या तलवारीचे रहस्य एक दंतकथा म्हणूनच अस्तित्वात आहे.

१६४६ सालची गोष्ट आहे. गोविंद देशपांडे, तानाजी भोसले अन् एकोजी असे एक विशेष त्रिकुट महाराजांनी रत्नागिरी प्रांतांत पाठवले. गोविंद देशपांडे प्रख्यात तलवारबाज म्हणून प्रसिद्ध होते. तोरणा किल्याच्या लढाईत त्यांनी तेवीस म्लेंछ सैनिकांना यमसदनी पाठविण्याचा पराक्रम केला होता. तानाजी हा मूळचा शिकारी. कुठल्याही जंगलात सावलीप्रमाणे वावर करत जनावरे मारणं हा त्याचा गुण महाराजांनी हेरला होता. एकोजी हा ५० वर्षांचा म्हातारा पण संपूर्ण महाराष्ट्र त्याने पहिला होता. महाराजांनी असे हे त्रिकुट आदिलशहाच्या रत्नागिरीत का बरे पाठवले होते ?



भाल्या खवीस ह्या महाभयानक डाकूने महाराष्ट्रांत चांगलेच नाव कमविले होते. अनेक धनिकांना आणि गरिबांना लुटत हा डाकू महाराष्ट्रभर आपली दहशत पसरवत होता. ह्याच्या टोळीत मुले आणि महिलासुद्धा होत्या. असा हा भल्या खविस रत्नागिरीत पोचलाय अशी बातमी हेरांनी महाराजाना दिली. भाल्याच्या टोळीवर हल्ला केला तर त्याचा खजिना आणि मुलुखाच्या जनतेची दुवासुद्धा मिळेल हा महाराजांचा मनसुबा होता. सुमारे तीस लोकांच्या ह्या टोळीवर नजर ठेवावी म्हणून महाराजांनी ह्या त्रिकुटाला रत्नागिरीत पाठविले होते. भाल्याच्या खजिन्याचा पत्ता मिळविणे, शक्य असेल तर त्यांच्या पुढील ठावठिकाणा प्राप्त करणे आणि त्याच्या शक्तीचा अंदाज घेणे हे विशेष काम हे त्रिकुट पार पाडेल असे महाराजांना वाटले होते.

सलग नऊ दिवस घोडदौड करत गोविंद देशपांडेच्या नेतृत्वाखाली हा चमू रत्नागिरीत पोचला. भाल्या खविस कुठे आहे हे माहीत करणे अवघड नव्हते. खेद गावात फुंगी नदीच्या किनाऱ्यावर तानाजीने तीसेक लोकांच्या वास्तव्याच्या खुणा असलेली एक जागा बघितली, तेथपासून एखाद्या वाघाने सावजाचा माग काढावा त्याप्रमाणे तानाजी भाल्याचा माग काढत गेला. रत्नागिरी शहराच्या वेशीवर आदिशक्ती देवीचे भग्न मंदिर होते, त्यामागे जिथे कोणीच माणूस फिरण्याची छाती करत नसे अशा एका देवराईत भाल्या आपला तळ ठोकून आहे असा कयास तानाजीने केला.



संध्याकाळचे ४ वाजले होते, सूर्यास्तास अजून अवकाश होता. भाल्याचा तळ बघून , नक्की किती माणसे आहेत, बरोबर काही खजिना वगैरे आहे का ? इत्यादी माहिती काढून घेण्यासाठी देशपांडेंनी तानाजीला देवराईत जाण्याचा आदेश दिला. एकदा शत्रूच्या संख्येचा अंदाज आला की एकोजींना त्या माहिती सकट माघारी पाठवायचे हा देशपांडेचा मनसुबा होता. आदिशक्ती देवीच्या मंदिराच्या मागे तिन्ही स्वार लपून राहिले. तानाजीने घोडा मागेच सोडून दिला व पायीच लपत छपत तो देवराईत आत गेला. संध्याकाळचे ६ वाजत आले सूर्य अस्ताला जाऊ लागला तरी तानाजीचा पत्ता नव्हता. एकोजीची अस्वस्थता देशपांडेना जाणवत होती. म्हातारा उगाच घाबरतोय असे त्यांना वाटत होते. सूर्य मावळला , रात्रीच्या अंधारात दूरूनच एक आकृती पळत येताना दिसत होती . ह्या पद्धतीने पळत येणारा माणूस तानाजी असू शकत नव्हता, कदाचित शत्रूला आपली चाहूल लागली असेल ह्या जाणीवेने देशपांडेनी आपली तलवार बाहेर काढली. एकोजी तलवार चालवण्यात विशेष नव्हता पण त्याने सुद्धा येणाऱ्या संकटाला ओळखून आपली तलवार काढली. शत्रूला चाहूल लागली असेल तर उगाच तलवारीला तलवार भिडवण्याऐवजी काढता पाय घेणे शहाणपणाचे होते , पण गोविंद देशपांडेसारख्या बहादूराला आपले शहाणपण चालणार नाही हे सुद्धा एकोजी ओळखून होता. जशी आकृती जवळ आली तसे हा शत्रू नसून आपलाच तानाजी आहे हे स्पष्ट झाले.

चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता, त्याला धाप लागली होती आणि घामाने त्याचे उत्तरीय चिंब भिजले होते.

       


                                                                                                                
"मूर्खा, असा जोराने पळून आला तर कुणी बघितले असते, तू की भूत-बित बघितले काई?" सरदार देशपांडे त्याच्यावर खेकसला.

"सगळे मेले आहेत. भाल्या खवीस आणि त्याचे एकूण ४३ साथीदार आत मरून पडले आहेत. स्त्रिया, मुले सगळे. काहींचे गळे कापले गेले आहेत तर काहींचे सर्व अवयव. खूपच भयानक दृश्य आहे. हे कुणी माणसाने करणे शक्यच नाही" तानाजी घाबरलेल्या स्थितीत सांगत होता.

"कुणी मारले त्यांना? कुणी जखमी वगैरे होता का?" एकोजीने विचारले.

"ठाऊक नाही! पण हे मनुष्याने केलेलं काम वाटत नाही. " तानाजी बोलता झाला.


"हा! काहीतरी बरळू नकोस. हे लोक मेले तर चांगलेच आहे. चल आत जाऊन पाहू की नक्की काय झाले आहे. कुणी वाचला असेल तर त्यांच्या मारेकऱ्याचा पत्ता सुद्धा लागेल" असे म्हणत गोविंदने आपल्या घोड्याला पुढे दामटले. घोडा हळूहळू देवराईच्या दिशेने चालू लागला.


"आम्हाला फक्त टोळीचा पत्ता काढायचा हुकुम होता, त्याची तामील आम्ही केली आहे, आता उगाच आत जायची गरज नाही" एकोजीने सरदाराचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. तानाजीला एवढा घाबरलेला त्याने पहिला नव्हता त्याशिवाय वातावरणात एक वेगळीच शक्ती एकोजीला जाणवत होती.

"हुकुम मला होता, तुम्हा दोघांचा हुकुम मी देईन. भीती वाटते तर दोघेजण मंदिरात थांबा पण ह्या घाबरटाची माहिती बरोबर नसेल तर मी स्वतः त्याचा शिरच्छेद करीन" गोविंद शांत स्वरांत बोलला. तानाजी आणि एकोजीने वाद घालण्यात अर्थ नाही हे ओळखून आपले घोडे आपल्या सरदाराच्या मागे चालविले.


देवराईची झाडे फार जुनी होती, घोड्यांना जाण्यासाठी फारच छोटी वाट होती. वातावरणात एक विशिष्ट प्रकारचे धुके दाटले होते. घोडे जंगल आणि दऱ्याखोऱ्यांतून प्रवासासाठी खास पद्धतीने तयार केले होते पण ह्या देवराईमध्ये घोडे पुढे जाण्यास कचरत होते.



"देवराईमध्ये यक्ष असतात असे माझी आई नेहमी सांगायची" तानाजी हळूच बोलला. "पोरा, स्त्रीच्या स्तनावर तोंड असताना ती जे काही सांगते त्यावर माणसाने कधीच विश्वास ठेऊ नये " एकोजीने दबलेल्या आवाजांत पण थोड्याश्या उपहासानेच तानाजीला टोला हांडला.

तानाजी अजून सावरला नव्हता. काही मिनिटात ते एका सपाट जागेवर पोचले दूरून काही तंबू दिसत होते,पण माणसांचा लवलेश नव्हता. "हीच जागा आहे का रे ?"गोविंदने विचारले. "होय इथेच सारी मृत शरीरं होती". मग "मला का बरे दिसत नाहीत ?" एकोजीने विचारले.

तिघे जण घोड्यावरून उतरले. पायीच चालत तंबूजवळ गेले. कुठेच माणसे दिसत नव्हती.

"इथेच तर होती सगळी शरीरं" तानाजी वेड्यासारखा इकडे तिकडे पळत बोलत होता. "मला वाटते ह्याला कुणीतरी झपाटले आहे " एकोजीने हळूच गोविंदच्या कानात सांगितले.

"भाल्या खविस इथे नाही तर कुठे आहे? हा कदाचित आमच्यासाठी रचलेला सापळा तर नाही?”  गोविंदने तालावर म्यानातून बाहेर काढत एकोजीला प्रश्न केला. नेहमी एकदम आत्मविश्वासाने बोलणाऱ्या आपल्या सरदाराच्या मनांत काही तरी शंका उत्पन्न झाली आहे हे एकोजीने ताडले. त्यानेसुद्धा आपली तलवार बाहेर काढली. का कुणास ठाऊक पण आज आपण ह्या देवराईतून जिवंत बाहेर जाणार नाही असं त्याला मनातून वाटायला लागलं.

तानाजी इकडे तिकडे वेड्यासारखा पळत होता, एकाठिकाणी साप चावल्यासारखी त्याने उडी मारली, नंतर वाकून काहीतरी उचललं. गोविंद आणि एकोजी पळत त्याचा जवळ गेले. तानाजीच्या हातांत रक्ताने ओथंबलेली आतडी होती. मातीत मिसळून त्यांचा रंग तपकिरी झाला होता पण रक्त ताजे होते. तिघांनी भयानेच एकमेकांकडे पाहिले. त्या क्षणी त्यांच्यात वय, हुद्दा इत्यादी काहीही फरक नव्हता. जणू काही "भय" ह्या एका दुव्याने तिघेही जण एकत्र बांधले गेले होते.



पण तानाजीचे डोळे अचानक बदलले, आपल्या मागे कुणीतरी आहे ही जाणीव गोविंदला झाली व त्याने मागे वळून बघितले. ७ फुटांची एक आकृती पुढे आली, तिघेही काही करतील ह्याआधीच त्या माणसाचा हात फिरला व एकोजीचे शीर क्षणार्धात धडावेगळे झाले. सगळीकडे रक्ताचा सडा पडला.


तानाजी भीतीनी पूर्णपणे थिजला होता पण गोविंद देशपांडे घाबरणाऱ्यांपैकी नव्हता. त्या आकृतीचा पुढील वार गोविंदने आपल्या तलवारीने सहज पेलला. गोविंदने मागे उडी घेतली व आपल्या शत्रूचा अंदाज घेतला. हा माणूस भाल्या खविस नव्हता, तोंडावरून तर हा माणूस १०० वर्षांचा म्हातारा वाटत होता पण अंगातील ताकद महामानवी होती. त्वचा थोडी निळसर होती व अंगावर काहीही वस्त्र नव्हते. गोविंदने त्याची तलवार निरखून पाहिली. गंज लागलेल्या जुनाट तलवारीसारखी ती तलवार वाटत होती पण मागच्या वारात ती तलवार अजिबात जुनी वाटली नव्हती.

ताकदीच्या बाबतीत आपला पडाव जास्त वेळ लागणार नाही हे गोविंदने ओळखले. सर्व हिंमत पणाला लावून गोविंद वेगाने आपल्या शत्रूवर चालून गेला, काही क्षणातच चारी बाजूने तलवारीचे प्रहार करीत गोविंद चारी दिशांत फिरत होता. कुठल्याच माणसाला अशा वेगांत फिरताना तानाजीने बघितले नव्हते. पण गोंविंदचा प्रत्येक वार त्या महामानवाने सहज झेलला. पुढच्याच क्षणी गोविंदची तलवार त्याच्या गळ्याला चाटून गेली, पण ती त्याचीच चाल होती. आपल्या दुसऱ्या हाताने त्याने गोविंदचे केस पकडले होते. पुढच्या क्षणी गोविंदाचा तलवार पकडलेला हात शरीरापासून वेगळा झाला. वेदनेने गोविंदचा आक्रोश सुरु झाला. मृत्यू समोर दिसून गोविंद आपल्या गुढग्यावर बसला , त्यानंतर तानाजीच्या डोळ्यांसमोर गोविंदचा सुद्धा शिरच्छेद झाला .

पुढे काय झाले तानाजीला समजले नाही. त्याला जाग आली तेंव्हा तो एका बैलगाडीच्या मागे होता. त्याचे हात-पाय बांधलेले होते, त्याने हलकेच डोळे उघडून पहिले तर महाराजांचे मावळे बाजूला घोड्यावर चालत होते.

-----------------------------------------------------

नोट-जर या साईट मध्ये काही चुकीची माहित असेल तर

आम्हाला फीडबॅक द्वारे कळवा आम्ही ती माहिती दुरुस्त

करण्याचा किंवा काढून टाकण्याचा प्रयत्न करू . या साईट

मधील माहिती व फोटो इन्टरनेट वरील विविध साईट वरून

गोळा केली आहे. आम्ही या साईट मधील माहिती व फोटोस

यांची मालकी सांगत नाही .हि माहिती व फोटोस त्या त्या

मालकांची संपत्ती आहे.

भूते पकडणारा तात्या नाव्ही

 भूते पकडणारा तात्या नाव्ही

सुचना- खाली दिलेल्या फोटो काल्पनिक आहेत वास्तवा काहीही संबंध नाही. 


 

कोणे एके काळी कोकणात एक तरुण नाव्ही एका छोट्या खेडेगावात राहत होता. त्याचे नाव होते तात्या. त्याला त्याचे केस कापणे आणि दाढी करणे हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक मनोरंजक कथा ऐकायचा.


पण जर एखाद्या माणसाने तात्यासमोर रडगाणे गायले तर तात्या त्याचे पैसे परत करत असे आणि म्हणे,"हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. या पैशांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे." त्यामुळे तात्या अनेकदा रिकाम्या हाती घरी येत असे.



त्यानंतर तात्याने दुसऱ्या गावात जाण्याचा निर्णय घेतला कारण त्याला वाटले की अनोळखी लोकांकडून पैसे घेणे त्याला सोपे जाईल. मग त्याने हत्यारांची पिशवी उचलली आणि दुसऱ्या गावाकडे मजल दर मजल करत जाऊ लागला. एके रात्री चालत असताना तात्या एका वटवृक्षाखाली बसला. दुपारचे ऊन वाढत होते म्हणून तो त्या झाडाखाली पहुडला आणि त्याचा डोळा लागला. त्याला तिकडेच खूप गाढ झोप लागली आणि रात्र होईपर्यंत तो जागा झालाच नाही.


त्या झाडावर एक भूत राहत होतं. रात्री जोरजोरात तात्या घोरु लागला, भूत लगेच झाडावरून खाली उतरले आणि हसायला लागले आणि मोठ्याने ओरडू लागले, "हा! हा! हा! आज रात्री मला जेवणात एक स्वादिष्ट पदार्थ मिळणार आहे."


भुताचा आवाज ऐकून तात्याला जाग आली. तात्या खूप घाबरला होता. पण त्याने पटकन विचार केला आणि तोही मोठ्याने ओरडला,"हा! हा! हा! मला तुझी भीती वाटत नाही, मी भूत पकडणारा नाव्ही आहे!" मग तात्याने त्याच्या पिशवीतून आरसा काढला आणि भूताच्या समोर ठेवला.


"हे बघ, हे भयानक भूत मी नुकतेच पकडले आहे. मी तुला आता पकडतो आणि तुला माझ्या पिशवीत त्याच्याबरोबर ठेवतो. पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तू कुठेही असशील, माझी पिशवी तुला शोधून काढेल." भूताने आयुष्यात यापूर्वी कधीही आरसा पाहिला नव्हता. त्यामुळे त्याला स्वतःचे प्रतिबिंब ओळखता आले नाही. "तात्या दादा, तुम्ही जे सांगाल ते मी करेन, पण कृपया मला त्या भयंकर भूताबरोबर तुमच्या पिशवीमध्ये डांबून ठेवू नका."

तात्या त्यावर म्हणाला,

"ठीक आहे मी आज रात्री तुझ्या झाडाखाली झोपणार आहे. सकाळपर्यंत तू मला सोन्याची एक हजार नाणी आणून दे नाहीतर मी तुला माझ्या पिशवीत डांबून ठेवीन."


भूताने तात्याच्या पिशवीकडे एक नजर टाकली आणि ते खूपच घाबरले. त्याने लगेच धूम ठोकली. जेव्हा तात्या सकाळी उठला तेव्हा भूताने त्याला एका मडक्यात एक हजार सोन्याची नाणी दिली.


"शाब्बास! माझी आणखी एक इच्छा तुला पूर्ण करावी लागेल. माझ्या घरा शेजारी एक मोठे कोठार बांध आणि उद्या सकाळपर्यंत ते भाताने पूर्णपणे भर. तरच मी तुला माझ्या जादूपासून मुक्त करीन." "उद्यापर्यंत हे करणे शक्य होणार नाही," भूत गयावया करत म्हणाले.


"माझ्या आदेशाचे त्वरित पालन करा, नाहीतर तू आयुष्यभर माझ्या पिशवीत सडत पडशील."हे ऐकून भूत खूप घाबरले आणि तिकडून निघून गेले .


घरी परतल्यानंतर, तात्याने त्याच्या पत्नीला एक हजार सोन्याची नाणी भरलेले मडके दाखवले. तात्याने भुताची संपूर्ण कहाणी त्याच्या पत्नीला कथन केली. तात्याची बायको आनंदाने म्हणाली


"तुमच्या बुद्धिमत्तेवर मी खूप खूश आहे.चला, आता आपले गरिबीचे दिवस संपतील." त्या दिवशी भूताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कष्ट केले. आणि गोदाम बांधून पूर्ण केले. गोदाम बनवल्यानंतर त्याने एक एक करून त्यात तांदळाची पोती भरली. जेव्हा भूत गोदाम बांधत होते, तेव्हा त्याचे काका तिथे आले. भूताच्या काकांनी संपूर्ण आयुष्यात इतके घाबरलेले भूत पाहिले नव्हते. भुताचे काका मोठ्याने ओरडले, "मुर्खा, हे तू काय करतोस?" भूत दचकले त्याने इकडेतिकडे पहिले आणि तात्या जवळपास नसल्याची खात्री करून घेतली मग हळूच ते काकांच्या कानात कुजबुजले, "हळू बोला काका! या घरात एक खूप शक्तिशाली माणूस राहतो. तात्या नाव्ही! तो भूते पकडण्यात प्रवीण आहे. मला आज संध्याकाळपर्यंत त्याचे काम पूर्ण करायचे आहे, नाहीतर तो मला त्याच्या पिशवीत कायमचा कैद करेल मला त्या पिशवीत कैद व्हायचे नाही कारण आधीच एक भयंकर भूत त्यात कैद आहे. "


भित्र्या पुतण्याचे बोलणे ऐकून त्याच्या काकांला खूप राग आला."अरे गाढवा, तुला माहीत नाही का कोणतीही मानवी शक्ती आपल्यावर काम करत नाही. तू चल आता माझ्याबरोबर. आपण त्याण तात्याला चांगला धडा शिकवू. मग तो भूतांचा योग्य आदर करायला शिकेल." त्यानंतर दोन्ही भुते तात्याच्या घराच्या खिडकीतून डोकावले. मग भूताचा काका खूप जोरात ओरडला आणि म्हणाला,


"हा! हा! हा! आज मी ह्या माणसाला खाऊन टाकेन! चल पुतण्या, एकत्र फडशा पाडू. पण त्याआधी त्याला चांगले शिजवूया." पण हे ऐकून तात्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता किंवा भीती दिसली नाही तेव्हा काका भूत खूप आश्चर्यचकित झाला. मग तात्या पुतण्या भूताला म्हणाला, "तू माझ्या आज्ञेचे पालन केले आहे आणि सर्व काम केली आहेस म्हणून तू आता मुक्त आहेस." मग तात्याने काका भुताकडे पाहिले आणि म्हणाला


"आता तुझ्या ऐवजी मी हे भूत माझ्या पिशवीत कैद करून ठेवतो." हे ऐकून काका भूत खूप चिडला. तो ओरडला. "तुझ्यासारख्या मूर्ख माणसाची माझ्यासारख्या भुताशी अशा शब्दात बोलण्याची हिंमत कशी झाली? "मग तात्याने त्याचा सर्वात मोठा आरसा काकाच्या भुताच्या चेहऱ्यासमोर ठेवला आणि तात्या ओरडला "तुला या भूताबरोबर राहायला आवडेल का?". काका भूत त्याच्या पुतण्या सारखाच बिनडोक होता. तो आणखीनच


"तात्या दादा, तुम्हाला जे पाहिजे ते करा, पण त्या भयंकर भूताबरोबर मला तुमच्या पिशवीत डांबून ठेवू नका. मी तुमच्यासाठी दोन हजार सोन्याच्या मोहरा आणीन. एक मोठा वाडा आणि दुकान बांधून देईन" तात्या म्हणाला, "ठीक आहे! जर तू तसे केलेस तर मी तुला सोडून देईन."काका भूतानी तात्याला दिलेले वचन पूर्ण केले. तेव्हापासून, काका भूत आणि त्याचा पुतण्या कधीच त्या तात्याच्या वाटेला गेले नाहीत.


तेव्हापासून तात्या आपले उर्वरित दिवस त्याच्या दुकानात आनंदाने केस कापणे, दाढी करणे आणि लोकांच्या मनोरंजक कथा ऐकण्यात घालवू लागला. आता तो गरजूंना सहजपणे मदत करू शकत होता याचा त्याला खूप आनंद झाला.




 CREDIT

लेख 👤कोण लिहिले आहे माहिती नाही पण ऊत्तम लेख आहे... 

 



लेबल: