शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

लाकडाच्या फटीमधून बाहेर येत होती भयानक बोटे, सत्य समोर आल्यानंतर उडाले लोकांचे होश…




 इंटरनेट असे जगन आहे जिथे कधी काय घडेल आणि काय ऐकायला मिळेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कधी कधी सोशल मिडियावर अशा गोष्टी व्हायरल होतात ज्या खूपच भयानक असतात. ज्या पहिल्यानंतर लोकांचे होश उडतात तर कधी कधी गोष्टी इतक्या मजेदार असतात कि आपल्याला हसू आवरत नाही.

इतकेच नाही तर अनेकवेळा हैराण करणारे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. जे पाहिल्यानंतर आल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक भयानक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल.

व्हायरल होत असलेला हा फोटो आईएफएस अधिकारी डॉ सम्राट गौड़ाने शेयर केला आहे. फोटोमध्ये एक मोठे लाकूड पाहायला मिळत आहे ज्यामधून भयानक बोटे बाहेर येताना दिसत आहेत. तुम्हाला पाहून असेल वाटेल कि कदाचित लाकडामध्ये एक भयानक राक्षस लपला आहे किंवा भूत आहे. तर असे काही नाही फोटोमध्ये बोटांसारखे दिसत असलेले एक प्रकारचे फंगस आहे जे पहिल्या नजरेमध्ये आपल्याला खूप भयानक वाटते.

या फोटोसोबत आईएफएस अधिकारीने एक प्रश्न देखील विचारला आहे कि तुम्ही अंदाज लावू शकता का हे काय आहे? मग काय याचे उत्तर देताना सोशल मिडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



लेबल:

छत्रपती शहाजीराजेनां अटक : महाराष्ट्राचा इतिहास



शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले.

शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.


शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली.

परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.


लेबल: