गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

सांगलीमध्ये थरार करणारी घटना घडली आहे. या घटनेने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

सांगलीमध्ये थरार करणारी घटना घडली आहे. या घटनेने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. बहीण भावाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला आहे. ही घटना अमृतवाडी येथे घडली आहे. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा बहीण-भावाचे मृतदेह विहिरीमध्ये सापडला आहे. ज्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण तयार झालं आहे. ही घटना अमृतवाडीमध्ये घडली असून परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. चार दिवसांपासून हे दोन बहीण भाऊ बेपत्ता झाले होती. त्यानंतर या दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. ही मुलं शेतमजुराची होती. सुलोचना गवळी (वय ५ वर्षे) आणि इंद्रजीत गवळी (वय ३ वर्षे) अशी या बहीण भावाची नाव आहेत. आनंद गवळी व त्यांच्या पत्नी नाशिक जिल्ह्यामधील जत तालुक्यातल्या अमृतवाडी येथील बागायतदार शेतकरी दीपक हत्ती यांच्याकडे काम करत होते. आनंद गवळी यांच्या पत्नीची तब्येत चार दिवसांपूर्वी खराब झाली होती. त्यामुळे त्यांना जतमध्ये उपचारासाठी नेलं होत. त्यांचंदरम्यान त्यांची चारी मुलं घरी एकटी होती. उपचार करून परतल्यानंतर आनंद गवळी आणि त्यांच्या पतीला त्यांची दोन मुलं घरात झोपलेली दिसली. मात्र सुलोचना व इंद्रजित घरात त्यांना दिसले नाहीत. त्यामुळे या दोघांना शोधण्यास सुरुवात केली. मात्र मुलं कुठेच दिसली नसल्यामुळे जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर जत पोलीस पोलिसांच्याकडून देखील या मुलांचा शोध सुरु झालं होता. पोलिसांनी घराजवळ असणाऱ्या एका विहिरीमध्ये मुलं पडल्याचा संशय आल्यामुळे तिथे देखील मुलांचा शोध घेतला गेला. मात्र त्यांना तिथे देखील मुलं सापडली नाहीत.

लेबल: